역대상 25장 마라티 IRV
- 1 दावीद आणि निवासमंडपाच्या अधिकाऱ्यांनी मिळून आसाफाच्या मुलांना एका खास कामासाठी निवडले. हेमान व यदूथून ही ती अपत्ये. वीणा, सतारी आणि झांजा ही वाद्ये, वाजवून देवाचा संदेश देणे असे त्यांच्या कामाचे स्वरूप होते. हे काम करणाऱ्या लोकांची यादी:
- 2 आसाफाच्या वंशातले: जक्कूर, योसेफ, नथन्या आणि अशेराला, हे आसाफाचे पुत्र राज्याच्या देखरेखीखाली आसाफाच्या मार्गदर्शनाखाली संदेश देत होते.
- 3 यदूथूनाचे वंशज: गदल्या, सारी, यशया, हशब्या व मत्तिथ्या हे सहाजण, आपला पिता यदूथून याच्या मार्गदर्शनाखाली वीणा वाजवून परमेश्वराचे उपकारस्मरण आणि स्तवन करून संदेश देत असे.
- 4 हेमानाचे वंशज: बुक्कीया, मत्तन्या, उज्जियेल, शबुएल, यरीमोथ, हनन्या, हनानी, अलियाथा, गिद्दल्ती, रोममती-एजेर, याश्बकाशा, मल्लोथी, होथीर आणि महजियोथ.
- 5 हेमान हा राजाचा संदेष्टा होता, हे सर्व हेमानाचे पुत्र शिंग वाजवायला होते. देवाने हेमानाला चौदा मुले आणि तीन मुली देऊन सन्मानीत केले.
- 6 हे सर्व आपल्या पित्याच्या मार्गदर्शनाखाली परमेश्वराच्या घरात ही अपत्ये झांजा, सतारी आणि वीणा वाजवून गीते गाण्यासाठी आणि देवाच्या घरातील सेवेसाठी होते. आसाफ, यदूथून व हेमान हे राजाच्या देखरेखीखाली होती.
- 7 ते आणि त्यांचे नातेवाईक गायनकलेत पारंगत व परमेश्वरासाठी गायनाचे प्रशिक्षण घेतलेले दोनशे अठ्याऐशींजण होते.
- 8 त्यांनी लहानथोर, गुरु-शिष्य सर्वानी आपल्या कामासाठी सारख्याच चिठ्ठ्या टाकल्या व कामे वाटून घेतली.
- 9 तेव्हा आसाफाच्या मुलांच्या संबंधीत: पहिली चिठ्ठी योसेफाची निघाली; दुसरी गदल्याची त्याची अपत्ये आणि भाऊबंद यांच्यातून बाराजणांना घेतले.
- 10 तिसरी चिठ्ठी जक्कूरचे पुत्र आणि भाऊबंद यांच्यामधून, बाराजणांना घेतले.
- 11 चौथी चिठ्ठी इस्रीची, त्याचे पुत्र आणि आप्त यांच्यामधून बाराजणांना घेतले.
- 12 पाचवी नथन्याची त्याचे पुत्र व नातलग यामधून बाराजण.
- 13 सहावी चिठ्ठी बुक्कीयाची. त्याचे पुत्र आणि भाऊबंद यांमधून बाराजण.
- 14 सातवी यशरेलाची. त्याचे पुत्र आणि भाऊबंद यांमधून बाराजण.
- 15 यशयाची आठवी. या चिठ्ठीनुसार पुत्र आणि भाऊबंद यामधून बाराजण.
- 16 नववी मत्तन्याची. त्याचे पुत्र आणि नातलग यामधून बाराजण.
- 17 दहावी शिमीची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण.
- 18 अकरावी अजरेलाची. त्याचे पुत्र आणि नातलाग यांमधून बाराजण.
- 19 बारावी हशब्याची. त्याचे पुत्र आणि त्याचे नातलग यांमधून बाराजण.
- 20 तेरावी शूबाएलाची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण.
- 21 चौदावी मत्तिथ्याची. त्याचे पुत्र आणि नातलगामधून बाराजण.
- 22 पंधरावी यरेमोथची. त्याचे पुत्र आणि नातेवाईक यांमधून बारा.
- 23 सोळावी हनन्याची. त्याचे पुत्र आणि भाऊबंद यांमधून बाराजण.
- 24 सतरावी याश्बकाशाची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण.
- 25 अठरावी हनानीची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण.
- 26 एकुणिसावी मल्लोथीची. त्याचे पुत्र आणि आप्त यांमधून बाराजण.
- 27 विसावी अलीयाथची. त्याचे पुत्र आणि नातलगामधून बाराजण.
- 28 एकविसावी होथीरची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण.
- 29 बावीसावी गिद्दल्तीची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण.
- 30 तेविसावी महजियोथची. त्याचे पुत्र आणि भाऊबंद यांमधून बाराजण.
- 31 चोविसावी रोममती-एजेरची. त्याचे पुत्र आणि नातलगामधून बाराजण.