역대상 6장 마라티 IRV
- 1 गेर्षोन, कहाथ आणि मरारी हे लेवीचे पुत्र.
- 2 अम्राम, इसहार, हेब्रोन आणि उज्जियेल हे कहाथाचे पुत्र.
- 3 अहरोन, मोशे, मिर्याम हे अम्रामचे पुत्र. नादाब, अबीहू, एलाजार व इथामार हे अहरोनाचे पुत्र.
- 4 एलाजाराचा पुत्र फिनहास, फिनहासचा अबीशूवा.
- 5 अबीशूवाचा पुत्र बुक्की. बुक्कीचा पुत्र उज्जी.
- 6 उज्जीने जरह्या याला जन्म दिला आणि जरहयाने मरायोथला.
- 7 मरायोथ हा अमऱ्या याचा बाप. आणि अमऱ्या अहीटूबचा.
- 8 अहीटूबचा पुत्र सादोक. सादोकाचा पुत्र अहीमास.
- 9 अहीमासचा पुत्र अजऱ्या. अजऱ्याचा पुत्र योहानान.
- 10 योहानानाचा, पुत्र अजऱ्या, शलमोनाने यरूशलेमामध्ये मंदिर बांधले तेव्हा हा अजऱ्याच याजक होता.
- 11 अजऱ्या याने अमऱ्या याला जन्म दिला. अमऱ्याने अहीटूबला.
- 12 अहीटूबचा पुत्र सादोकाचा पुत्र शल्लूम.
- 13 शल्लूमचा पुत्र हिल्कीया. हिल्कीयाचा पुत्र अजऱ्या.
- 14 अजऱ्या म्हणजे सरायाचे पिता. सरायाने यहोसादाकला जन्म दिला.
- 15 परमेश्वराने नबुखद्नेस्सराच्या हातून यहूदा आणि यरूशलेम यांचा पाडाव केला तेव्हा यहोसादाक युध्दकैदी झाला.
- 16 गर्षोम, कहाथ आणि मरारी हे लेवीचे पुत्र.
- 17 लिब्नी आणि शिमी हे गर्षोमचे पुत्र.
- 18 अम्राम, इसहार, हेब्रोन, उज्जियेल हे कहाथाचे पुत्र.
- 19 महली आणि मूशी हे मरारीचे पुत्र. लेवी कुळातील घराण्यांची ही नावे. पित्याच्या घराण्याप्रमाणे त्यांची वंशावळ दिलेली आहे.
- 20 गर्षोमचे वंशज असे, गर्षोमचा पुत्र लिब्नी. लिब्नीचा पुत्र यहथ. यहथया पुत्र जिम्मा.
- 21 जिम्माचा पुत्र यवाह. यवाहाचा इद्दो. इद्दोचा पुत्र जेरह. जेरहचा यात्राय.
- 22 कहाथाचे वंशज असे, कहाथचा पुत्र अम्मीनादाब. अम्मीनादाबचा कोरह. कोरहचा पुत्र अस्सीर.
- 23 अस्सीरचा पुत्र एलकाना आणि एलकानाचा पुत्र एब्यासाफ. एब्यासाफचा पुत्र अस्सीर.
- 24 अस्सीरचा पुत्र तहथ, तहथचा पुत्र उरीएल. उरीएलचा उज्जीया. उज्जीयाचा शौल.
- 25 अमासय आणि अहीमोथ हे एलकानाचे पुत्र.
- 26 एलकानाचा पुत्र सोफय. सोफयचा पुत्र नहथ.
- 27 नहथचा पुत्र अलीयाब. अलीयाबाचा यरोहाम. यरोहामाचा एलकाना. एलकानाचा पुत्र शमुवेल.
- 28 थोरला योएल आणि दुसरा अबीया हे शमुवेलाचे पुत्र.
- 29 मरारीचे पुत्र, मरारीचा पुत्र महली. महलीचा लिब्नी. लिब्नीचा पुत्र शिमी. शिमीचा उज्जा.
- 30 उज्जाचा पुत्र शिमा शिमाचा हग्गीया आणि त्याचा असाया.
- 31 कराराचा कोश तंबूत ठेवल्यावर दावीदाने परमेश्वराच्या घरात गायनासाठी काही जणांची नेमणूक केली.
- 32 यरूशलेमेत शलमोन परमेश्वराचे मंदिर बांधीपर्यंत ते दर्शनमंडपाच्या निवासमंडपासमोर गायनपूर्वक सेवा करीत व ते आपल्या कामावर क्रमानुसार हजर राहत.
- 33 गायनसेवा करणाऱ्यांची नावे, कहाथ घराण्यातील वंशज, हेमान हा गवई. हा योएलाचा पुत्र. योएल शमुवेलचा पुत्र.
- 34 शमुवेल एलकानाचा पुत्र. एलकाना यरोहामाचा पुत्र. यरोहाम अलीएलचा पुत्र. अलीएल तोहाचा पुत्र.
- 35 तोहा सूफाचा पुत्र. सूफ एलकानाचा पुत्र. एलकाना महथचा पुत्र. महथ अमासयाचा पुत्र.
- 36 अमासय एलकानाचा पुत्र. एलकाना योएलाचा पुत्र. योएल अजऱ्याचा पुत्र. अजऱ्या सफन्याचा पुत्र.
- 37 सफन्या तहथचा पुत्र. तहथ अस्सीरचा पुत्र. अस्सीर एब्यासाफचा पुत्र. एब्यासाफ कोरहचा पुत्र.
- 38 कोरह इसहारचा पुत्र. इसहार कहाथचा पुत्र. कहाथ लेवीचा आणि लेवी इस्राएलाचा पुत्र.
- 39 आसाफ हेमानाचा नातलग होता. हेमानच्या उजवीकडे आसाफ उभा राहून सेवा करीत असे. आसाफ हा बरेख्या याचा पुत्र. बरेख्या शिमाचा पुत्र.
- 40 शिमा मीखाएलचा पुत्र. मिखाएल बासेया याचा पुत्र. बासेया मल्कीया याचा पुत्र.
- 41 मल्कीया एथनीचा पुत्र, एथनी जेरहचा पुत्र जेरह हा अदाया याचा पुत्र.
- 42 अदाया एतानाचा पुत्र. एथाना हा जिम्मा याचा पुत्र. जिम्मा शिमीचा पुत्र.
- 43 शिमी यहथ याचा पुत्र. यहथ हा गर्षोम याचा पुत्र. गर्षोम लेवीचा पुत्र.
- 44 मरारीचे वंशज हेमान आणि आसाफ यांचे नातलग होते. गाताना त्यांचा गट हेमानच्या डावीकडे उभा राहत असे. एथान हा किशीचा पुत्र. किशी अब्दीचा पुत्र. अब्दी मल्लूखचा पुत्र.
- 45 मल्लूख हशब्याचा पुत्र. हशब्या अमस्याचा पुत्र. अमस्या हा हिल्कीया याचा पुत्र.
- 46 हिल्कीया अमसीचा पुत्र. अमसी बानीचा पुत्र. बानी शेमर पुत्र.
- 47 शेमेर महलीचा पुत्र. महली मूशीचा पुत्र, मूशी मरारीचा पुत्र मरारी हा लेवीचा पुत्र.
- 48 आणि त्यांचे भाऊ लेवी देवाच्या घराच्या मंडपाच्या सर्व सेवेस नेमलेले होते.
- 49 अहरोन व त्याचे पुत्र हे होमवेदीवर आणि धूपवेदीवर अर्पणे करीत असत. देवाचा सेवक मोशे याने जे आज्ञापिले त्याप्रमाणे परमपवित्रस्थानाच्या सर्व कामासाठी व इस्राएल लोकांकरता प्रायश्चित्त करीत.
- 50 अहरोनाचे वंशज असे मोजले, अहरोनाचा पुत्र एलाजार. एलाजाराचा पुत्र फिनहास. फिनहासचा पुत्र अबीशूवा.
- 51 अबीशूवाचा पुत्र बुक्की. बुक्कीचा पुत्र उज्जी. उज्जीचा पुत्र जरह्या.
- 52 जरह्याचा पुत्र मरायोथ. मरायोथचा पुत्र अमऱ्या. अमऱ्याचा पुत्र अहीटूब.
- 53 अहीटूबचा पुत्र सादोक आणि सादोकाचा पुत्र अहीमास.
- 54 अहरोनाच्या वंशाला नेमून दिलेले राहण्याचे स्थान खालीलप्रमाणे होते. कहाथ कुळाची पहिली चिठ्ठी निघाली.
- 55 यहूदा देशातील हेब्रोन नगर आणि त्याच्या आसपासची कुरणे त्यांना मिळाली.
- 56 त्यापुढची जागा आणि हेब्रोन नगराजवळची खेडी यफुन्नेचा पुत्र कालेब याला मिळाली.
- 57 अहरोनाच्या वंशजांना हेब्रोन हे नगर मिळाले. हेब्रोन हे आश्रयनगर होते. याखेरीज त्यांना लिब्ना, यत्तीर, एष्टमोवा,
- 58 हीलेन त्याच्या कुरणासह, दबीर त्याच्या कुरणासह.
- 59 आशान, युत्ता, आणि बेथ-शेमेश ही नगरे त्यांच्या आसपासच्या कुरणासकट मिळाली.
- 60 बन्यामीनच्या वंशातील लोकांस गिबा, अल्लेमेथ, अनाथोथ ही नगरे त्यांच्या आसपासच्या कुरणासकट मिळाली. कहाथाच्या वंशजांना तेरा नगरे मिळाली.
- 61 कहाथाच्या उरलेल्या काही वंशजांना चिठ्ठ्या टाकून मनश्शेच्या अर्ध्या वंशांतून दहा नगरे मिळाली.
- 62 गर्षोमच्या वंशजातील कुळांना तेरा नगरे मिळाली. ही त्यांना इस्साखार, आशेर, नफताली आणि बाशान मधील काही मनश्शे या वंशांच्या घराण्यांकडून मिळाली.
- 63 मरारीच्या वंशजांतील कुळांना बारा नगरे मिळाली. रऊबेनी, गाद आणि जबुलून यांच्या घराण्यांतून, चिठ्ठ्या टाकून त्यांना ती मिळाली.
- 64 ही नगरे व भोवतालची जमीन इस्राएल लोकांनी मग लेवींना दिली.
- 65 यहूदा, शिमोन आणि बन्यामीन यांच्या घराण्यातून, चिठ्ठ्या टाकून, लेवी वंशजांना ती नगरे देण्यात आली.
- 66 एफ्राईमाच्या वंशजांनी काही नगरे कहाथाच्या वंशजांना दिली. ती ही चिठ्ठ्या टाकून ठरवण्यात आली.
- 67 एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातील आश्रयाची नगरे शखेम व त्याचे कुरण, तसेच गेजेर व त्याचे कुरण,
- 68 यकमाम, बेथ-होरोन,
- 69 अयालोन आणि गथ-रिम्मोन ही नगरे कुरणाच्या जमिनीसकट त्यांना मिळाली.
- 70 मनश्शेच्या अर्ध्या वंशातून इस्राएलांनी आनेर आणि बिलाम ही गावे कुरणासह कहाथाच्या वंशाच्या लोकांस दिली.
- 71 गर्षोमच्या वंशजांना बाशानातले गोलान आणि अष्टारोथ हे त्यांच्या भोवतालच्या कुरणासह, मनश्शेच्या अर्ध्या वंशाकडून मिळाले.
- 72 त्याखेरीज गर्षोमच्या वंशजांना केदेश, दाबरथ, रामोथ, आनेम ही नगरे भोवतालच्या कुरणासह इस्साखाराच्या वंशजांकडून मिळाली.
- 73 रामोथ त्याच्या कुरणासह आणि आनेम त्याच्या कुरणासह.
- 74 माशाल, अब्दोन, हूकोक, रहोब ही नगरे, कुरणासह, आशेर वंशातून गर्षोम कुटुंबांना मिळाली.
- 75 हुकोक कुरणासह आणि रहोब कुरणासह दिली.
- 76 गालीलमधले केदेश, हम्मोन, किर्याथाईम ही कुरणासह नगरे नफतालीच्या वंशातून गर्षोम वंशाला मिळाली.
- 77 आता उरलेले लेवी म्हणजे मरारी लोक त्यांना योकनीम, कर्ता, रिम्मोनो आणि ताबोर ही नगरे जबुलूनच्या वंशाकडून मिळाली. नगराभोवतीची जमिनही अर्थातच मिळाली.
- 78 यार्देनेच्या पलीकडे यरीहोजवळ, यार्देन नदीच्या पूर्वेला रऊबेनी वंशाकडून बेसेर कुरणासकट, यहसा भोवतालच्या कुरणासकट,
- 79 कदेमोथ कुरणासकट आणि मेफाथ कुरणासकट दिली.
- 80 मरारी कुटुंबांना गाद वंशाकडून गिलाद येथील रामोथ, महनाईम कुरणासकट;
- 81 हेशबोन, याजेर ही नगरे देखील आसपासच्या गायरानासकट मिळाली.