역대상 8장 마라티 IRV
- 1 बेला हा बन्यामीनचा ज्येष्ठ पुत्र. आशबेल हा दुसरा आणि अहरह हा तिसरा.
- 2 चौथा नोहा व पाचवा राफा.
- 3 आणि बेलाचे पुत्र अद्दार, गेरा, अबीहूद,
- 4 अबीशूवा, नामान, अहोह,
- 5 गेरा, शफूफान आणि हुराम हे बेलाचे पुत्र.
- 6 एहूदाचे पुत्र गिबा येथल्या पितृकुलाचे प्रमुख होते. त्यास पाडाव करून मानाहथ येथे नेले.
- 7 नामान, अहीया व गेरा यांस त्याने कैदी करून नेले. त्यास उज्जा व अहिहूद हे झाले.
- 8 शहरयिमाने मवाबात आपल्या पत्नी हुशीम आणि बारा यांना घटस्फोट दिला. यानंतर त्यास दुसऱ्या एका पत्नीपासून अपत्ये झाली.
- 9 त्याची पत्नी होदेश हिच्यापासून त्यास योबाब, सिब्या, मेशा, मल्काम,
- 10 यऊस, शख्या, मिर्मा हे पुत्र झाले. ते आपल्या पित्याच्या घराण्यांचे प्रमुख होते.
- 11 हुशीम पासून शहरयिमाला अबीटूब आणि एल्पाल हे पुत्र झाले.
- 12 एबर, मिशाम शमेद, बरीया आणि शमा हे एल्पालाचे पुत्र. शमेदने ओनो आणि लोद व त्या आसपासची गावे वसवली.
- 13 बरीया आणि शमा हे अयालोनमधील घराण्यांचे प्रमुख होते. त्यांनी गथ येथील रहिवाश्यांना हुसकावून लावले.
- 14 हे बरीयाचे पुत्र: अह्यो, शाशक, यरेमोथ,
- 15 जबद्या. अराद, एदर,
- 16 मीखाएल, इश्पा, योहा हे बरीयाचे पुत्र.
- 17 जबद्या, मशुल्लाम, हिज्की, हेबेर,
- 18 इश्मरय, इज्लीया, योबाब हे एल्पालचे पुत्र.
- 19 याकीम, जिख्री, जब्दी,
- 20 एलीएनय, सिलथय, अलीएल,
- 21 अदाया, बराया, शिम्राथ हे शिमीचे पुत्र
- 22 इश्पान, एबर, अलीएल,
- 23 अब्दोन, जिख्री, हानान,
- 24 हनन्या, एलाम, अनथोथीया,
- 25 इफदया, पनुएल हे शाशकचे पुत्र होत.
- 26 शम्शरय, शहऱ्या, अथल्या,
- 27 यारेश्या, एलीया, जिख्री हे यरोहामाचे पुत्र.
- 28 हे सर्व आपापल्या घराण्यांचे प्रमुख होते. ते यरूशलेम येथे राहत होते.
- 29 गिबोनाचा पिता यइएल. तो गिबोनामध्ये राहत होता. त्याची पत्नी माका.
- 30 त्याचा ज्येष्ठ पुत्र अब्दोन. सूर, कीश, बाल, नादाब,
- 31 गदोर, अह्यो, जेखर आणि मिकलोथ ही इतर अपत्ये.
- 32 शिमा हा मिकलोथचा पुत्र. आपल्या यरूशलेममधील बांधवांच्या जवळच हे सर्व राहत होते.
- 33 कीशचा पिता नेर. कीश शौलाचा पिता. आणि शौल योनाथान, मलकीशुवा, अबीनादाब, एश्बाल यांचा पिता.
- 34 योनाथानाचा पुत्र मरीब्बाल. मरीब्बाल मीखाचा पिता.
- 35 पीथोन, मेलेख, तरेया आणि आहाज हे मीखाचे पुत्र.
- 36 यहोअद्दाचे वडील आहाज. यहोअद्दा आलेमेथ, अजमावेथ व जिम्री यांचा पिता होता. जिम्री हा मोसाचा पिता होता.
- 37 बिनाचा पिता मोसा. बिनाचा पुत्र राफा. राफाचा एलासा. एलासाचा आसेल.
- 38 आसेलला सहा पुत्र होते. ते म्हणजे अज्रीकाम, बोखरु, इश्माएल, शाऱ्या, ओबद्या, हान.
- 39 आसेलचा भाऊ एशेक. त्याचे पुत्र: ज्येष्ठ पुत्र ऊलाम, दुसरा यऊश आणि तिसरा अलीफलेत.
- 40 ऊलामचे पुत्र शूर आणि उत्तम धनुर्धर होते. पुत्र, नातवंडे मिळून दिडशें जण होते. हे सर्व बन्यामीनाचे वंशज होते.