에스라 2장 마라티 IRV
- 1 बाबेलचा राजा नबुखद्नेस्सराने बाबेलास नेलेले यरूशलेम आणि यहूदा प्रांतातील बंद कैदी मुक्त होऊन आपापल्या नगरात परतले.
- 2 जरुब्बाबेलाबरोबर आलेले ते हे येशूवा, नहेम्या, सराया, रएलाया, मर्दखय, बिलशान, मिस्पार, बिग्वई, रहूम व बाना. इस्राएली लोकांची यादी येणे प्रमाणे.
- 3 परोशाचे वंशज दोन हजार एकशे बाहत्तर.
- 4 शफाट्याचे वंशज तीनशे बहात्तर.
- 5 आरहाचे वंशज सातशे पंचाहत्तर.
- 6 येशूवा व यवाब यांच्या वंशजातील पहथ-मवाबाचे वंशज दोन हजार आठशे बारा.
- 7 एलामाचे वंशज एक हजार दोनशे चौपन्न.
- 8 जत्तूचे वंशज नऊशें पंचेचाळीस.
- 9 जक्काईचे वंशज सातशे साठ.
- 10 बानीचे वंशज सहाशे बेचाळीस.
- 11 बेबाईचे वंशज सहाशे तेवीस.
- 12 अजगादाचे वंशज एक हजार दोनशे बावीस.
- 13 अदोनीकामाचे वंशज सहाशे सहासष्ट.
- 14 बिग्वईचे वंशज दोन हजार छपन्न.
- 15 आदीनाचे वंशज चारशे चौपन्न.
- 16 हिज्कीयाच्या घराण्यातील आटेराचे वंशज अठ्याण्णव.
- 17 बेसाईचे वंशज तीनशे तेवीस.
- 18 योराचे वंशज एकशे बारा.
- 19 हाशूमाचे वंशज दोनशे तेवीस.
- 20 गिबाराचे वंशज पंचाण्णव.
- 21 बेथलहेमातील लोक एकशे तेवीस.
- 22 नटोफातील लोक छपन्न.
- 23 अनाथोथतील लोक एकशे अठ्ठावीस.
- 24 अजमावेथातील लोक बेचाळीस
- 25 किर्याथ-आरीम, कफीरा आणि बैरोथ येथील लोक सातशे त्रेचाळीस.
- 26 रामा व गिबा मधील लोक सहाशे एकवीस.
- 27 मिखमासातील लोक एकशे बावीस.
- 28 बेथेल आणि आय येथील लोक दोनशे तेवीस.
- 29 नबोतील लोक बावन्न.
- 30 मग्वीशाचे लोक एकशे छपन्न.
- 31 दुसऱ्या एलामाचे लोक एक हजार दोनशे चौपन्न.
- 32 हारीम येथील लोक तीनशे वीस.
- 33 लोद, हादीद आणि ओनो येथील लोक सातशे पंचवीस.
- 34 यरीहोतील लोक तीनशे पंचेचाळीस.
- 35 सनाहाचे लोक तीन हजार सहाशे तीस.
- 36 याजक येशूवाच्या घराण्यातील यदयाचे वंशज नऊशें त्र्याहत्तर.
- 37 इम्मेराचे वंशज एक हजार बावन्न.
- 38 पशूहराचे वंशज एक हजार दोनशे सत्तेचाळीस.
- 39 हारीमाचे वंशज एक हजार सतरा.
- 40 लेवी, होदव्याच्या घराण्यातील येशूवा व कदमीएल यांचे वंशज चौऱ्याहत्तर.
- 41 मंदिरातील गायक आसाफचे वंशज एकशे अठ्ठावीस.
- 42 मंदिराच्या द्वारपालांचे वंशज, शल्लूम, आटेर, तल्मोन, अक्कूवा, हतीता आणि शोबाई यांचे वंशज एकूण एकशे एकोणचाळीस.
- 43 मंदिरातील नेमून दिलेली सेवा, सीहा, हसूफा, तब्बाबोथ यांचे वंशज.
- 44 केरोस, सीहा, पादोन.
- 45 लबाना, हगबा, अकूबा,
- 46 हागाब, शम्लाई, हानान.
- 47 गिद्देल, गहर, राया,
- 48 रसीन, नकोदा, गज्जाम,
- 49 उज्जा, पासेह, बेसाई,
- 50 अस्ना, मऊनीम, नफसीम.
- 51 बकबुक हकूफ, हरहुर,
- 52 बस्लूथ, महीद, हर्षा,
- 53 बार्कोस, सीसरा, तामह,
- 54 नसीहा, हतीफा.
- 55 शलमोनाच्या सेवाकांचे वंशज, सोताई, हसोफरत, परुदा,
- 56 जाला, दार्कोन, गिद्देल,
- 57 शफाट्या, हत्तील, पोखेरेथ-हस्सबाईम, आमी
- 58 मंदिरातील चाकर आणि शलमोनच्या सेवकांचे नेमून दिलेले काम करणारे वंशज एकूण तीनशे ब्याण्णव होते.
- 59 तेल-मेलह, तेल-हर्षा, करुब, अद्दान, इम्मेर या ठिकाणांहून काहीजण यरूशलेमेला आले होते पण आपण इस्राएलाच्या वंशातलेच पूर्वज आहोत हे ते सिद्ध करू शकले नाहीत.
- 60 दलाया, तोबीया आणि नकोदाचे वंशज सहाशे बावन्न.
- 61 आणि याजकांचे वंशज: हबया, हक्कोस, बर्जिल्ल्य (ज्याने बर्जिल्ल्य गिलादी याच्या मुलींपैकी एक मुलगी पत्नी करून घेतली होती आणि त्यास त्याचे नाव पडले होते.)
- 62 आपल्या घराण्याची वंशावळ त्यांनी नोंदपुस्तकात शोधून पाहिली पण त्यांना ती सापडली नाही म्हणून त्यांनी त्यांचे याजकपण अशुद्ध केले.
- 63 याकरीता अधिपतीने त्यांना सांगितले की, उरीम व थुम्मीम घातलेला याजक मंजूर होईपर्यंत त्यांनी पवित्र अर्पण खाऊ नये.
- 64 सर्व समुदाय एकंदर बेचाळीस हजार तीनशे साठ इतका होता.
- 65 त्यामध्ये त्यांच्या सात हजार तीनशे सदतीस दासदासी यांचा आणि मंदिरातील दोनशे गायकांचा यांचा समावेश नाही.
- 66 त्यांचे घोडे सातशे छत्तीस, खेचरे दोनशे पंचेचाळीस.
- 67 त्यांचे उंट चारशे पस्तीस. त्यांची गाढवे सहा हजार सातशे वीस होती.
- 68 हे सर्वजण यरूशलेमेत परमेश्वराच्या मंदिराजवळ आले. मग अनेक घराण्याच्या प्रमुखांनी मंदिराच्या बांधकामासाठी खुशीने भेटी दिल्या.
- 69 या वास्तूच्या कामासाठी त्यांनी आपल्या शक्तीप्रमाणे दिलेली दाने ती अशी: सोने एकसष्ट हजार दारिक, चांदी पाच हजार माने, आणि याजकांचे झगे शंभर.
- 70 याप्रकारे याजक, लेवी आणि इतर काही लोक, गायक, द्वारपाल आणि ज्यांना मंदिरातील सेवा नेमून दिली होती ते आपापल्या नगरांत राहिले. इस्राएलातील सर्व लोक आपापल्या नगरांत वस्ती करून राहिले.