욥기 26장 마라티 IRV
- 1 नंतर ईयोबाने उत्तर दिले आणि म्हणाला,
- 2 “बलहिन असलेल्यास तू कसे साहाय्य केले, शक्ती नसलेल्या बाहूंना तू कसे सोडविले.
- 3 बुध्दीनसलेल्यास तू कसा सल्ला दिलास, आणि तू त्यास केवढे ज्ञान कळविले.
- 4 तू कोणाच्या साह्यायाने हे शब्द बोललास? तुझ्यातुन कोणाचे मन प्रगट झाले.
- 5 बिल्ददने उत्तर दिले, मृत झालेल्याची प्रेते जलनिधीच्या खाली निर्जनस्थळी थरथरा कापत आहेत.
- 6 देवापुढे अधोलोक नग्न आहे, त्याच्यापुढे विनाशस्थान स्वत:ला झाकून घेवू शकत नाही.
- 7 त्याने उत्तरेकडील नभोमंडळ शुन्य आकाशावर पसरवले आहे, आणि त्याने पृथ्वी निराधार टांगली आहे.
- 8 तिच्या गडद मेघात तो पाणी बांधून ठेवतो, तरी त्याच्या ओझ्याने मेघ फाटत नाही.
- 9 तो चंद्राचा चेहरा झाकतो आणि त्यावर आपले मेघ पसरवितो.
- 10 त्याने पाण्याच्या पृष्ठभागावर एक वर्तुळाकार सीमा कोरली आणि प्रकाश व अंधकार यांच्यामध्ये क्षितीजरेखा आखली.
- 11 त्याच्या धमकीने आकाशस्तंभ थरथरतात आणि भयचकीत होतात.
- 12 तो आपल्या सामर्थ्याने समुद्र स्थिर करतो, तो आपल्या ज्ञानबलाने राहाबाला छिन्नभिन्न करतो.
- 13 त्याचा नि:श्वास आकाशातील वादळ स्वच्छ करतो त्याच्या हातांनी पळून जाणाऱ्या सापाला नष्ट केले.
- 14 पाहा, या त्याच्या मार्गाचा केवळ कडा आहे, किती हळूवार आम्ही त्याचे ऐकतो! परंतू त्याच्या बलाची गर्जना कोण समजू शकेल?”