욥기 33장 마라티 IRV
- 1 “ईयोब, मी तुला विनंती करतो, माझे बोलने ऐक. माझे सर्व शब्दांकडे लक्ष दे.
- 2 पाहा, मी आता बोलायला माझे मुख उघडले आहे, माझी जीभ माझ्या तोंडात हालू लागली आहे.
- 3 माझे शब्दच माझ्या अंत:करणाचे प्रामाणिकपण सांगतील, माझ्या ओठांना जे माहीती आहे, तेच ते प्रामाणिकपणे बोलतील.
- 4 देवाच्या आत्म्याने मला निर्माण केले आहे, मला सर्वशक्तिमान देवाच्या श्वासाद्ववारे जीवन मिळाले आहे.
- 5 तुला शक्य झाले तर मला उत्तर दे, माझ्याशी वाद घालण्याकरता तुझी उत्तरे तयार ठेव.
- 6 पाहा, देवासमोर मी आणि तू सारखेच आहोत, मलाही माती पासून उत्पन्न केले आहे.
- 7 पाहा, माझी दरारा तुला घाबरवणार नाही, माझा दाब तुला जड होणार नाही.
- 8 तू जे बोललास ते मी निश्चित ऐकले, मी तुझ्या शब्दांचा आवाज असे म्हणतांना ऐकला,
- 9 ‘मी शुध्द आहे, मी निरपराध आहे, मी काहीही चूक केली नाही मी निर्दोष आहे, आणि माझ्यामध्ये पाप नाही.
- 10 पाहा, देव माझ्यावर हल्ला करण्याची संधी पाहतो देवाने मला शत्रूप्रमाणे वागवले आहे.
- 11 देवाने माझ्या पायला साखळदंड बांधले देव माझी प्रत्येक हालचाल बघतो.’
- 12 पाहा, मी तुला उत्तर देईल तू या बाबतीत चुकतो आहेस, देव कोणत्याही मनुष्यापेक्षा महान आहे.
- 13 तू त्याच्याशी का वाद घालत आहेस? तो आपल्या कोणत्याही करणीचे कारण सांगत नाही.
- 14 देव एकदा बोलतो, होय दोनदा बोलतो, तरी मनुष्य त्याकडे लक्ष देत नाही.
- 15 देव लोकांशी रात्री ते गाढ झोपेत असताना स्वप्नात किंवा दृष्टांतात बोलत असेल, जेव्हा मनुष्य गाढ झोपेत असतो.
- 16 नंतर देव मनुष्याची कानउघडणी करतो, आणि त्याच्या धमकीने घाबरवितो.
- 17 मनुष्यास त्यांना पापाच्या हेतूपासून मागे ओढण्यासाठी, आणि गर्व न करण्याचेही सांगतो.
- 18 देव गर्तेतून मनुष्याचे जीवन वाचवितो, त्याच्या जीवनाला मरणापासून वाचवितो.
- 19 मनुष्याला केलेल्या शिक्षेमुळे अंथरुणात पडून दु:ख भोगत असेल वेदनेने त्याची सगळी हाडे तळमळतात.
- 20 नंतर तो मनुष्य खाऊ शकत नाही चांगल्या अन्नाचासुध्दा त्यास तिरस्कार वाटतो.
- 21 त्याचे शरीर इतके क्षीण होते की तो जवळ जवळ दिसेनासा होतो. त्याची सगळी हाडे जी कधी दिसली नाही ती आता दिसतात.
- 22 खरोखर, तो मृत्यूलोकाजवळ येऊन ठेपतो आणि त्याचे जीवन मरणपंथाला लागलेले असते.
- 23 परंतू एखादा देवदूत जर त्याचा मध्यस्थ झाला, मध्यस्थ, हजारो देवदुतापैकी एक, त्यास चांगला मार्ग दाखवणारा.
- 24 आणि देवदूत त्याच्याशी दयेने वागेल, आणि देवाला सांगेल. ‘या मनुष्यास मृत्युलोकात जाण्यापासून वाचव त्याच्या पापाची किंमत मोजण्याचा दुसरा एक मार्ग मला सापडला आहे.’
- 25 मग त्याचे शरीर पुन: बालकासारखे जोमदार बनेल. तो तरुणपणी जसा मजबूत होता तसाच पुन्हा होईल.
- 26 तो देवाची प्रार्थना करेल आणि देव त्यास दया देईल. म्हणजे तो देवाचे मुख आनंदाने पाहील. नंतर तो मनुष्य पुन्हा चांगले जीवन जगायला लागेल.
- 27 नंतर तो लोकांस कबुली देईल. तो म्हणेल, ‘मी पापकर्म केले. मी पाप केले चांगल्याचे वाईट केले. पंरतू माझ्या पापाला शिक्षा झाली नाही.
- 28 त्याने माझ्या आत्म्याला मृत्युलोकात जाण्यापासून वाचवेल. माझ्या जीव नियमीत त्याचा प्रकाश पाहील.
- 29 पाहा, देव या गोष्टी मनुष्यासाठी करतो, दोनदा, होय तीनदा,
- 30 त्याच्या जीवाला मृत्युलोकात जाण्यापासून वाचवण्यासाठी असे करतो म्हणजे त्याचे जीवन प्रकाशाने प्रकाशीत होते.
- 31 ईयोबा, मी काय म्हणतो त्याकडे लक्ष दे. माझे ऐक! तू गप्प रहा आणि मला बोलू दे.
- 32 पण ईयोबा, जर तुला माझे बोलणे पटत नसेल तर तू खुशाल बोल. मला तुझे मुद्दे सांग. कारण मला तुझे बोलणे सुधारायचे आहे.
- 33 परंतु ईयोबा, तुइयाजवळ बोलण्यासारखे काही नसेल तर माझे ऐक. तू गप्प रहा आणि मी तुला शहाणपण शिकवेन.”