시편 108편 마라티 IRV
- 1 हे देवा, माझे मन स्थिर आहे; मी आदराने माझ्या मनापासून संगिताने गाणे गाईन.
- 2 हे सतार आणि वीणे, तुम्ही जागृत व्हा. मी पहाटेला जागे करीन.
- 3 हे परमेश्वरा, मी तुला लोकांमध्ये धन्यवाद देईन; मी राष्ट्रांमध्ये तुझी स्तुतीगान गाईन.
- 4 कारण तुझा महान विश्वासाचा करार आकाशाहून उंच आहे; आणि तुझी सत्यता आकाशाला पोहचली आहे.
- 5 हे देवा, तू आकांशाच्यावर उंचावलेला आहे. आणि तुझी महिमा सर्व पृथ्वीवर होवो.
- 6 म्हणून ज्यांना तू प्रेम करतो त्यांनी वाचावे, तुझ्या उजव्या हाताने आम्हास वाचव आणि मला उत्तर दे.
- 7 देव आपल्या पवित्रतेत म्हणाला, “मी उल्लासेन; मी शखेम विभागीन आणि सुक्कोथाचे खोरे मोजून देईन.
- 8 गिलाद माझा आहे आणि मनश्शे माझा आहे. एफ्राईमही माझे शिरस्त्राण आहे. यहूदा माझा राजदंड आहे.
- 9 मवाब माझे स्नानाचे पात्र आहे. अदोमावर मी आपले पादत्राण फेकीन. मी पलिष्टीया विषयी विजयाने आरोळी करीन.”
- 10 तटबंदीच्या नगरात मला कोण घेऊन जाईल? मला अदोमात कोण नेईल?
- 11 हे देवा, तू आम्हास नाकारले नाही का? तू आमच्या सैन्याबरोबर युद्धास गेला नाहीस.
- 12 आमच्या शत्रूविरूद्ध आम्हास मदत दे, कारण मनुष्याची मदत निष्फळ आहे.
- 13 देवाच्या मदतीने आम्ही विजयी होऊ; तो आपल्या शत्रूला पायाखाली तुडवील.