시편 111편 마라티 IRV

  1. 1 परमेश्वराची स्तुती करा. सरळ जनांच्या सभेत आणि मंडळीत मी परमेश्वरास अगदी मनापासून धन्यवाद देईल.
  2. 2 परमेश्वराचे कार्य महान आहेत, जे सर्व त्याची आवड धरतात ते उत्सुकतेने त्याची प्रतीक्षा करतात.
  3. 3 त्याचे कार्य ऐश्वर्यशाली आणि वैभवशाली आहे, आणि त्याचे न्यायीपण सर्वकाळ टिकून राहते.
  4. 4 त्याच्या आश्चर्यकारक गोष्टी आठवणीत राहतील असे त्याने केले; परमेश्वर कृपाळू आणि दयाळू आहे.
  5. 5 तो आपल्या विश्वास ठेवणाऱ्यांना अन्न देतो. तो आपला करार नेहमी आठवतो.
  6. 6 त्याने आपल्या लोकांस राष्ट्रांचे वतन देऊन, आपली सामर्थ्याची कार्ये दाखवली आहेत.
  7. 7 त्याच्या हातचे कार्य सत्य व न्याय्य आहे; त्याचे सर्व विधी विश्वसनीय आहेत.
  8. 8 ते प्रामाणिकपणाने आणि योग्य रीतीने नेमिलेले आहेत, ते सर्वकाळासाठी स्थापिले आहेत.
  9. 9 त्याने आपल्या लोकांस विजय दिला आहे; त्याने आपला करार सर्वकाळासाठी ठरवला आहे, देवाचे नाव पवित्र व भितीदायक आहे.
  10. 10 परमेश्वराचे भय शहाणपणाची सुरुवात आहे; जे त्याप्रमाणे वागतात त्यास सुबुद्धी प्राप्त होते. त्याची स्तुती सर्वकाळ टिकून राहील.