시편 113편 마라티 IRV

  1. 1 परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराच्या सेवकांनो तुम्ही त्याची स्तुती करा. परमेश्वराच्या नावाची स्तुती करा.
  2. 2 आतापासून सदासर्वकाळ परमेश्वरावचे नाव धन्यवादित असो.
  3. 3 सूर्याच्या उगवतीपासून ते त्याच्या मावळतीपर्यंत, परमेश्वराच्या नावाची स्तुती होवो.
  4. 4 परमेश्वर सर्व राष्ट्रांच्या वरती उंचावला जावो, आणि त्याचे गौरव आकाशाच्यावरती पोहचो.
  5. 5 आमचा देव परमेश्वर यासारखे कोण आहे, त्याच्यावर कोणाचे राजासन आहे,
  6. 6 जो वरून खाली आकाश आणि पृथ्वीकडे पाहतो,
  7. 7 तो गरीबांना धुळीतून वर उचलतो आणि गरजवंताला राखेच्या ढिगाऱ्यातून वर काढतो.
  8. 8 अशा करता की, ते आपल्या अधिपतीच्या बरोबर, आपल्या अधिपतींच्याबरोबर बसावे.
  9. 9 अपत्यहीन स्त्रीला घर देऊन, तो मुलांची आनंदी आई करतो. परमेश्वराची स्तुती करा.