시편 120편 마라티 IRV

  1. 1 माझ्या संकटात मी परमेश्वराकडे मोठ्याने ओरडलो, आणि त्याने मला उत्तर दिले.
  2. 2 हे परमेश्वरा, जे कोणी आपल्या ओठाने खोटे बोलतात, आणि आपल्या जिभेने फसवतात त्यापासून माझा जीव सोडीव.
  3. 3 हे कपटी जिभे, तुला काय दिले जाईल, आणि आणखी तुला काय मिळणार?
  4. 4 तो योद्ध्याच्या धारदार बाणांनी, रतम लाकडाच्या जळत्या निखाऱ्यावर बाणाचे टोक तापवून तुला मारील.
  5. 5 मला हायहाय! कारण मी तात्पुरता मेशेखात राहतो, मी पूर्वी केदारच्या तंबूमध्ये राहत होतो.
  6. 6 शांतीचा तिरस्कार करणाऱ्यांबरोबर मी खूप काळ राहिलो आहे.
  7. 7 मी शांतीप्रिय मनुष्य आहे, पण जेव्हा मी बोलतो, ते युध्दासाठी उठतात.