시편 122편 마라티 IRV
- 1 आपण परमेश्वराच्या घराला जाऊ असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला.
- 2 हे यरूशलेमे, तुझ्या द्वारात आमची पावले लागली आहेत.
- 3 हे यरूशलेमे, एकत्र जोडलेल्या नगरीसारखी तू बांधलेली आहेस.
- 4 इस्राएलास लावून दिलेल्या नियमाप्रमाणे, तुझ्याकडे वंश, परमेश्वराचे वंश, परमेश्वराच्या नांवाचे उपकारस्मरण करण्यासाठी वर चढून येतात.
- 5 कारण तेथे न्यायासने, दावीदाच्या घराण्यासाठी राजासने मांडली आहेत.
- 6 यरूशलेमच्या शांतीसाठी प्रार्थना करा! तुझ्यावर प्रीती करतात त्यांची भरभराट होईल.
- 7 तुझ्या कोटात शांती असो, आणि तुझ्या राजवाड्यात उन्नती असो.
- 8 माझे बंधू आणि माझे सहकारी ह्यांच्याकरता, मी आता म्हणेन, तुमच्यामध्ये शांती असो.
- 9 परमेश्वर आमचा देव ह्याच्या घराकरता, मी तुझ्या हितासाठी प्रार्थना करीन.