시편 127편 마라티 IRV
- 1 परमेश्वर जर घर बांधीत नाही, तर तो जे बांधतो ते काम व्यर्थ आहे. जर परमेश्वर नगर रक्षित नाही, तर पहारेकरी उभे राहून रक्षण करतात ते व्यर्थ आहे.
- 2 तुम्ही पहाटे लवकर उठता, रात्री उशीराने घरी येता, किंवा कठोर परिश्रम करून भाकर खाता हे सर्व व्यर्थ आहे कारण परमेश्वर आपल्या प्रियजनास लागेल ते झोपेतही देतो.
- 3 पाहा, मुले ही परमेश्वरापासून मिळालेले वतन आहे, आणि पोटचे फळ त्याच्यापासून मिळालेली देणगी आहे.
- 4 तरुणपणाची मुले हे वीराच्या हातातील बाणांसारखी आहेत.
- 5 ज्या मनुष्याचा भाता अशांनी भरला आहे, तो धन्य! तो वेशीवर शत्रूंशी त्याची बोलाचाली होत असता, ते फजीत होणार नाहीत.