시편 130편 마라티 IRV

  1. 1 हे परमेश्वरा, मी तुला शोकसागरातून आरोळी मारीत आहे.
  2. 2 हे प्रभू, माझी वाणी ऐक; माझ्या विनवणीच्या वाणीकडे तुझे कान लक्षपूर्वक लागलेले असोत.
  3. 3 हे परमेश्वरा, तू जर अन्याय लक्षात ठेवशील तर, हे प्रभू, तुझ्यासमोर कोण उभा राहू शकेल?
  4. 4 पण त्यांनी तुझे भय धरावे, म्हणून तुझ्याजवळ क्षमा आहे.
  5. 5 मी परमेश्वराची वाट पाहतो, माझा आत्मा वाट पाहतो, आणि त्याच्या वचनावर मी आशा ठेवतो.
  6. 6 पहाटेची वाट पाहणाऱ्या पहारेकऱ्यापेक्षा माझा जीव प्रभूची अधिक वाट पाहतो.
  7. 7 हे इस्राएला, परमेश्वरावर आशा ठेव. कारण परमेश्वर दयाळू आहे, आणि त्याच्याजवळ विपुल उद्धार आहे.
  8. 8 तोच इस्राएलास त्यांच्या सर्व पापांपासून मुक्त करीन.