시편 149편 마라티 IRV
- 1 परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वरास नवे गीत गा; विश्वासणाऱ्याच्या मंडळीत त्याचे गीत गा.
- 2 इस्राएल आपल्या निर्माणकर्त्याच्या ठायी आनंदोत्सव करो. सियोनेचे लोक आपल्या राजाच्या ठायी आनंद करोत.
- 3 ते त्याच्या नावाची स्तुती नाचून करोत; ते त्याच्या स्तुतीचे गीत डफाने आणि वीणेने करो.
- 4 कारण परमेश्वर आपल्या लोकात आनंद घेत आहे; तो दीनांना तारणाने गौरवितो.
- 5 भक्त विजयाने हर्षभरित होवोत; ते आपल्या अंथरुणावरुन विजयासाठी गाणे गावो.
- 6 देवाची स्तुती त्यांच्या मुखात असो, आणि दुधारी तलवार त्यांच्या हातात असो.
- 7 यासाठी की त्यांनी राष्ट्रावर सूड उगवावा आणि लोकांस शिक्षा करावी.
- 8 ते त्यांच्या राजांना साखळंदडाने आणि त्यांच्या सरदारांना लोखंडी बेड्यांनी बांधतील.
- 9 ते लिहून ठेवलेला जो न्याय आहे तो अंमलात आणतील. हा त्याच्या सर्व विश्वास ठेवणाऱ्यांसाठी आदर आहे. परमेश्वराची स्तुती करा.