시편 53편 마라티 IRV
- 1 मूर्ख आपल्या मनात म्हणतो, तेथे देव नाही. ते भ्रष्टाचारी आहेत आणि त्यांनी तिरस्करणीय अन्यायाचे कृत्य केले आहे; त्यातल्या कोणीही चांगले कृत्य केले नाही.
- 2 देव स्वर्गातून मानवजातीच्या मुलांकडे पाहतो की, जर तेथे कोणी समजदार आहे, आणि जो देवाचा शोध घेतो.
- 3 त्यातील प्रत्येकजण माघारी गेला आहे; सर्व भ्रष्ट झाले आहेत; त्यातल्या एकानेही चांगले कृत्य केले नाही, एकानेही नाही.
- 4 ज्यांनी अन्याय केला, त्यांना काहीही माहित नव्हते काय? ज्यांनी माझ्या लोकांस भाकरीप्रमाणे खाल्ले, पण ते देवाला हाक मारत नाही.
- 5 तेथे भिण्याचे काही कारण नव्हते, तरी ते मोठ्या भयात होते; कारण तुझ्याविरूद्ध तळ देणाऱ्यांची देवाने हाडे विखुरली आहेत; असे लोक लज्जित झाले आहेत कारण देवाने त्यांना नाकारले आहे.
- 6 अहो, सियोनातून इस्राएलाचे तारण येवो! जेव्हा देव आपल्या लोकांस बंदिवासातून परत आणील, तेव्हा याकोब आनंद करेल आणि इस्राएल हर्षित होईल!