시편 54편 마라티 IRV

  1. 1 हे देवा, तू आपल्या नावाने मला वाचव, आणि तुझ्या सामर्थ्यात माझा न्याय कर.
  2. 2 हे देवा, माझी प्रार्थना ऐक; माझ्या शब्दाकडे कान दे.
  3. 3 कारण माझ्याविरूद्ध परके उठले आहेत, आणि दयाहीन माणसे माझ्या जीवाच्या मागे लागली आहेत; त्यांनी आपल्यापुढे देवाला ठेवले नाही.
  4. 4 पाहा, देव माझा मदतनीस आहे; प्रभू माझ्या जिवाला उचलून धरणाऱ्या बरोबर आहे.
  5. 5 तो माझ्या शत्रूंना वाईटाची परत फेड करील; तू माझ्यासाठी आपल्या विश्वासूपणाने त्यांचा नाश कर.
  6. 6 मी तुला स्वखुशीने अर्पणे अर्पीण; हे परमेश्वरा, मी तुझ्या नावाला धन्यवाद देईन, कारण हे चांगले आहे.
  7. 7 कारण त्याने मला प्रत्येक संकटातून सोडवले आहे; माझे डोळे माझ्या शत्रूंकडे विजयाने पाहतात.