시편 67편 마라티 IRV
- 1 देवाने आमच्यावर दया करावी आणि आम्हांस आशीर्वाद द्यावा. आणि त्याने आमच्यावर आपला मुखप्रकाश पाडावा.
- 2 याकरिता की, तुझे मार्ग पृथ्वीवर माहित व्हावेत, तुझे तारण सर्व राष्ट्रामध्ये कळावे.
- 3 हे देवा, लोक तुझी स्तुती करोत; सर्व लोक तुझी स्तुती करोत.
- 4 राष्ट्रे हर्ष करोत आणि हर्षाने गावोत, कारण तू लोकांचा न्याय सरळपणे करशील आणि राष्ट्रावर राज्य करशील.
- 5 हे देवा, लोक तुझी स्तुती करोत; सर्व लोक तुझी स्तुती करोत.
- 6 भूमीने आपला हंगाम दिला आहे आणि देव, आमचा देव, आम्हास आशीर्वाद देवो.
- 7 देव आम्हास आशीर्वाद देवो आणि पृथ्वीवरील सर्व सीमा त्याचा सन्मान करोत.