시편 87편 마라티 IRV

  1. 1 परमेश्वराचे नगर पवित्र पर्वतावर स्थापले आहे.
  2. 2 याकोबाच्या सर्व तंबूपेक्षा परमेश्वरास सियोनेचे द्वार अधिक प्रिय आहे.
  3. 3 हे देवाच्या नगरी, तुझ्याविषयी गौरवाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.
  4. 4 राहाब आणि बाबेल माझे अनुयायी आहेत असे मी सांगेन. पाहा, पलिष्टी, सोर व कूश म्हणतात त्यांचा जन्म तेथलाच.
  5. 5 सियोनेविषयी असे म्हणतील की, हा प्रत्येक तिच्यात जन्मला होता; आणि परात्पर स्वतः तिला प्रस्थापित करील.
  6. 6 लोकांची नोंदणी करताना, ह्याचा जन्म तेथलाच होता असे परमेश्वर लिहील.
  7. 7 गायन करणारे आणि वाद्ये वाजवणारेही म्हणतील की, माझ्या सर्व पाण्याचे झरे तुझ्यात आहेत.”