시편 98편 마라티 IRV

  1. 1 परमेश्वरास नवीन गीत गा, कारण त्याने आश्चर्यकारक गोष्टी केल्या आहेत; त्याने आपल्या उजव्या हाताने आणि आपल्या पवित्र बाहूने आम्हास विजय दिला आहे.
  2. 2 परमेश्वराने आपले तारण कळवले आहे; त्याने सर्व राष्ट्रांच्यासमोर आपले न्यायीपण उघडपणे दाखवले आहे.
  3. 3 त्याने इस्राएलाच्या घराण्यासाठी आपली निष्ठा आणि विश्वासाचा करार यांची आठवण केली; पृथ्वीच्या सर्व सीमांनी आमच्या देवाचा विजय पाहिला आहे.
  4. 4 अहो सर्व पृथ्वी, परमेश्वराचा जयजयकार करा; उच्च स्वराने आणि आनंदाने गा, स्तुतिगायन करा.
  5. 5 परमेश्वराचे स्तुतिगान वीणेवर करा, वीणेवर मधुर स्वराने गायन करा.
  6. 6 कर्णा आणि शिंगाच्या आवाजाने, परमेश्वर राजासमोर आनंदाने जयघोष करा.
  7. 7 समुद्र आणि त्यातील प्रत्येकगोष्ट गर्जना करोत, जग व त्यामध्ये राहणारे हर्षनाद करोत.
  8. 8 नद्या टाळ्या वाजवोत, आणि पर्वत हर्षनाद करोत.
  9. 9 परमेश्वर पृथ्वीचा न्याय करण्यास येत आहे; तो न्यायीपणाने जगाचा आणि सरळपणाने राष्ट्रांचा न्याय करील.