민수기 26장 마라티 IRV
- 1 मरी येऊन गेल्यानंतर परमेश्वर मोशे आणि अहरोनाचा मुलगा याजक एलाजार यांच्याशी बोलला. तो म्हणाला,
- 2 “इस्राएलात, वीस वर्षाचे आणि वीस वर्षांवरील अधिक वयाचे असून युध्दास जाण्याच्या लायकीचे असतील त्या सगळ्या मंडळीची त्यांच्या पूर्वजांच्या घराण्याप्रमाणे मोजणी करा.”
- 3 तेव्हा मोशे आणि याजक एलाजार त्याच्याशी बोलले यरीहोपाशी यार्देन नदीतीरी मवाबाच्या मैदानात त्यांना बोलले, ते म्हणाले,
- 4 मोशे आणि जे इस्राएल लोक, मिसर देशातून बाहेर आले होते त्यांना परमेश्वराने ही आज्ञा दिल्याप्रमाणे, वीस वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांची तुम्ही मोजणी करा.
- 5 रऊबेन हा इस्राएलाचा पहिला जन्मलेला मुलगा होता. रऊबेनाच्या मुलांपासून जी कुळे आली ती कुळे म्हणजे: हनोखाचे हनोखी कूळ, पल्लूचे पल्लूवी कूळ.
- 6 हेस्रोनाचे हेस्रोनी कूळ, कर्मीचे कर्मी कूळ.
- 7 रऊबेनाच्या वंशातील ही कुळे. त्यामध्ये एकूण त्रेचाळीस हजार सातशे तीस भरली.
- 8 पल्लूचा मुलगा अलीयाब.
- 9 अलीयाबाची मुले नमुवेल, दाथान व अबीराम. दाथान व अबीराम हे दोन पुढारी मोशेच्या आणि अहरोनाच्या विरूद्ध गेले होते. कोरह जेव्हा परमेश्वराच्या विरूद्ध गेला तेव्हा त्यांनी कोरहाला पाठींबा दिला.
- 10 त्यावेळी ती अडीचशे माणसे अग्नीने खाऊन टाकली, त्याचे सर्व अनुयायी मरण पावले तेव्हा धरतीने आपले तोंड उघडले आणि तिने कोरहासह त्यांना गिळून टाकले. ते इशाऱ्याचे चिन्ह असे झाले.
- 11 परंतु कोरहाच्या कुळातले इतर लोक मात्र मरण पावले नाहीत.
- 12 शिमोनाच्या कुळातलीही काही कुळेः नमुवेलाचे नमुवेली कूळ, यामीनाचे यामीनी कूळ, याकीनाचे याकीनी कूळ,
- 13 जेरहाचे जेरही कूळ, शौलाचे शौली कूळ.
- 14 ही शिमोनी वंशातील कुळे. ते एकूण बावीस हजार दोनशे.
- 15 गाद कुळातून जी कुळे निर्माण झाली ती अशीः सफोनाचे सफोनी कूळ, हग्गीचे हग्गी कूळ, शूनीचे शूनी कूळ,
- 16 आजनीचे आजनी कूळ, एरीचे एरी कूळ,
- 17 अरोदाचे अरोदी कूळ. अरलीचे अरेली कूळ.
- 18 गादच्या वंशातील ही कूळे. त्यामध्ये एकूण चाळीस हजार पाचशे पुरुष होते.
- 19 जेरहाचे जेरही कूळ. यहूदाची दोन मुले एर आणि ओनान हे कनान मध्ये मरण पावले.
- 20 यहूदाच्या कुळातून जी कूळे निर्माण झाली ती अशीः शेलाचे शेलानी कूळ, पेरेसाचे पेरेसी कूळ, जेरहाचे जेरही कूळ
- 21 पेरेसाच्या कुळातील ही कुळेः हेस्रोनाचे हेस्रोनी कूळ, हामूलाचे हामूली कूळ.
- 22 ही यहूदाच्या कुळातील कुळे. त्यामध्ये एकूण शहात्तर हजार पाचशे पुरुष होते.
- 23 इस्साखाराच्या कुळातील काही कुळे अशी:तोलाचे तोलाई कूळ पूवाचे पुवाई कूळ.
- 24 याशूबाचे याशूबी कूळ, शिम्रोनाचे शिम्रोनी कूळ.
- 25 इस्साखाराच्या कुळातील ही कुळे. त्यामध्ये एकूण चौसष्ट हजार तीनशे पुरुष होते.
- 26 जबुलूनाच्या कुळातील कुळेः सेरेदचे सेरेदी कूळ, एलोनाचे एलोनी कूळ, याहलेलचे याहलेली कूळ.
- 27 जबुलूनाच्या कुळातील ही कुळे, त्यामध्ये एकूण साठ हजार पाचशे पुरुष होते.
- 28 योसेफाची मुले मनश्शे व एफ्राईम. या प्रत्येकापासून कुळे निर्माण झाली.
- 29 मनश्शेच्या कुळातील कुळेः माखीराचे, माखीरी कूळ (माखीर गिलादाचा बाप होता), गिलादाचे गिलादी कूळ.
- 30 गिलादाची कूळे होतीः इयेजेराचे इयेजेरी कूळ, हेलेकाचे हेलेकी कूळ.
- 31 अस्रियेलाचे अस्रियेली कूळ, शेखेमाचे शेखेमी कूळ.
- 32 शमीदचे शमीदाई कूळ, हेफेराचे हेफेरी कूळ.
- 33 हेफेराचा मुलगा सलाफहाद याला मुले नव्हती, फक्त मुली होत्या. त्याच्या मुलींची नावे महला, नोआ, होग्ला, मिल्का व तिरसा.
- 34 ही मनश्शेच्या कुळातील कुळे होती ते एकूण बावन्न हजार सातशे पुरुष होते.
- 35 एफ्राइमाच्या कुळातील घराणी पुढीलप्रमाणे होती, शूथेलाहाचे शूथेलाही कूळ. बेकेराचे बेकेरी कूळ व तहनाचे तहनी कूळ.
- 36 एरान शूथेलाहाच्या कुटुंबातील होता. एरानाचे कूळ एरानी.
- 37 ही एफ्राइमाच्या कुळातील कुळे: त्यामध्ये बत्तीस हजार पाचशे पुरुष होते. ते सगळे योसेफाच्या कुळातील होते.
- 38 बन्यामीनाच्या कुळातील कुळे होतीः बेलाचे बेलाई कूळ, आशबेलाचे आशबेली कूळ, अहीरामाचे अहीरामी कूळ.
- 39 शफूफामाचे शफूफामी कूळ, हुफामाचे हुफामी कूळ.
- 40 बेला ह्याचे पुत्र आर्द व नामान हे होते. आर्दीचे आर्दी कूळ, नामानाचे नामानी कूळ.
- 41 ही सगळी कुळे बन्यामीनाच्या कुळातील. त्यातील पुरुषांची संख्या पंचेचाळीस हजार सहाशे होती.
- 42 दानाच्या कुळातील कुळे होती: शूहामाचे शूहामी कूळ. ही कूळे दानाच्या कुळातील होते.
- 43 शूहामीच्या कुळात अनेक कुळे होती. त्यातील पुरुषांची संख्या चौसष्ट हजार चारशे होती.
- 44 आशेराच्या कुळातील कुळे होतीः इम्नाचे इम्नाई कूळ, इश्वीचे इश्वी कूळ, बरीयाचे बरीयाई कूळ.
- 45 बरीयाच्या कुळातील कुळे होतीः हेबेराचे हेबेरी कूळ, मलकीएलाचे मलकीएली कूळ.
- 46 आशेरला सेरा नावाची मुलगी होती.
- 47 ही सगळे लोक आशेराच्या कुळातील होते. त्यातील पुरुषांची संख्या त्रेपन्न हजार चारशे होती.
- 48 नफतालीच्या कुळातील कुळे होतीः यहसेलाचे यहसेली कूळ, गूनीचे गूनी कूळ.
- 49 येसेराचे येसेरी कूळ, शिल्लेमाचे शिल्लेमी कूळ.
- 50 ही नफतालीच्या कुळातील कुळे, त्यातील पुरुषांची संख्या पंचेचाळीस हजार चारशे होती.
- 51 ही इस्राएलामधील मोजलेली पूर्ण पुरुषांची संख्या सहा लाख एक हजार सातशे तीस होती.
- 52 परमेश्वर मोशेशी बोलला व म्हणाला,
- 53 त्यांच्या नावाच्या संख्येप्रमाणे वतनासाठी देश वाटून द्यायचा आहे.
- 54 मोठ्या कुळाला जास्त वतन मिळेल आणि लहान कुळाला कमी वतन मिळेल. त्यांना जे वतन मिळेल ती त्या कुळात मोजलेल्या मनुष्यांच्या समप्रमाणात असेल.
- 55 देश चिठ्ठ्या टाकून वाटायचा आहे त्यांच्या वडिलांच्या वंशाच्या नावांप्रमाणे त्यांनी वतन करून घ्यावा.
- 56 प्रत्येक लहान आणि मोठ्या कुळाला वतन मिळेल आणि निर्णय करण्यासाठी तू चिठ्ठ्या टाकशील.
- 57 त्यांनी लेव्याच्या कुळातील, कुळांचीही गणती केली, ती ही होतीः गेर्षोनाचे गेर्षोनी कूळ, कहाथाचे कहाथी कूळ, मरारीचे मरारी कूळ.
- 58 लेव्याची ही कूळे होतीः लिब्नी कूळ, हेब्रोनी कूळ, महली कूळ, मूशी कूळ, आणि कोरही कूळ. अम्राम कहाथाच्या कुळातील होता.
- 59 अम्रामाच्या पत्नीचे नाव योखबेद होते. ती सुद्धा लेव्याच्या कुळातील होती. ती मिसर देशात जन्मली. अम्राम आणि योखाबेदला दोन मुले: अहरोन आणि मोशे. त्यांना एक मुलगीही होती. तिचे नाव मिर्याम.
- 60 नादाब, अबीहू, एलाजार व इथामार यांचे अहरोन वडील होते.
- 61 पण नादाब व अबीहू हे परमेश्वरासमोर अन्य अग्नी अर्पीत असताना मरण पावले.
- 62 लेव्याच्या कुळातील एकूण पुरुषांची संख्या तेवीस हजार होती. परंतु यांची गणती इस्राएलाच्या इतर लोकांबरोबर केली नाही. परमेश्वराने इतर लोकांस वतन दिले त्यामध्ये यांना हिस्सा मिळाला नाही.
- 63 मोशे आणि याजक एलाजार यांनी जे मोजले ते हेच आहेत. त्यांनी मवाबाच्या मैदानात यरीहोजवळ यार्देनवर इस्राएलाच्या वंशाची मोजणी केली.
- 64 खूप वर्षांपूर्वी सीनायाच्या वाळवंटात मोशे आणि याजक अहरोन यांनी इस्राएल लोकांची गणती केली होती. पण ते सगळे लोक आता मरण पावले होते. त्यापैकी कोणीही आता जिवंत नव्हते.
- 65 कारण इस्राएल लोकांस तुम्ही रानात मराल असे परमेश्वराने सांगितले होते. फक्त दोन पुरुषांना परमेश्वराने जिवंत ठेवले होते. यफुन्नेचा मुलगा कालेब व नूनाचा मुलगा यहोशवा होते.