여호수아 12장 마라티 IRV
- 1 यार्देन नदीच्या पूर्वेकडील सूर्य उगवतो त्या बाजूला, आर्णोन नदीपासून ते हर्मोन डोंगरापर्यंत, आणि पूर्वेकडील संपूर्ण अराबाचा प्रदेश इस्राएल लोकांनी जिंकून काबीज केला, त्याच्या राजांची नावे ही आहेत:
- 2 अमोऱ्यांचा राजा सीहोन; जो हेशबोन शहरात राहत होता, तो खोऱ्याच्या मध्यावर आर्णोन गोर्गच्या काठावर असणाऱ्या अरोएरपासून अम्मोन्यांच्या अर्ध्या गिलादावर खाली याब्बोक सीमेपर्यंत राज्य करत असे.
- 3 किन्नेरोथ समुद्रापर्यंत आराबावर, अराब समुद्राच्या पूर्वेकडे, बेथ-यशिमोथापर्यंत आणि दक्षिणेकडे, पिसगा पर्वताच्या उतरणीपर्यंतसुद्धा सीहोन राज्य करत असे.
- 4 बाशानाचा राजा ओग, उरलेल्या रेफाई लोकांतून राहिलेल्यांपैकी एक होता, तो अष्टारोथ व एद्रई येथे राहत होता.
- 5 तो हर्मोन पर्वत, सलेख, आणि संपूर्ण बाशानावर, गशूरी सीमेपर्यंत आणि माकाथी, आणि अर्ध्या गिलादावर, हेशबोनचा राजा सीहोन याच्या सीमेपर्यंत राज्य करत असे.
- 6 परमेश्वराचा सेवक मोशे, आणि इस्राएली लोकांनी त्यांचा पराभव केला, आणि परमेश्वराचा सेवक मोशे याने ती भूमी रऊबेनी, गादी, आणि मनश्शेचा अर्धा वंश यांना वतन म्हणून दिली.
- 7 यार्देनेच्या पश्चिमेस लबानोन खोऱ्यातील बाल-गादापासून सेईरास जाणाऱ्या घाटातील हालाक डोंगरापर्यंत ज्या राजांचे देश होते आणि ज्यांना यहोशवा व इस्राएल लोकांनी मारले ते हे, हा देश यहोशवाने इस्राएल वंशाना त्यांच्या वाट्याप्रमाणे वतन म्हणून दिला,
- 8 डोंगराळ प्रदेशात, तळवटीत, अराबात, उतरणीत, रानात आणि नेगेबात, हित्ती, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी व यबूसी राहत होते.
- 9 या राजांमध्ये, यरीहोचा राजा, बेथेलशेजारी असलेल्या आयचा राजा,
- 10 यरूशलेमचा राजा, हेब्रोनाचा राजा,
- 11 यर्मूथाचा राजा, लाखीशाचा राजा
- 12 एग्लोनाचा राजा, गेजेराचा राजा,
- 13 दबीरचा राजा, बेथ-गेदेरचा राजा,
- 14 हर्माचा राजा, अरादचा राजा,
- 15 लिब्नाचा राजा, अदुल्लामाचा राजा.
- 16 मक्केदाचा राजा बेथेलचा राजा,
- 17 तप्पूहाचा राजा, हेफेरचा राजा,
- 18 अफेकाचा राजा, शारोनचा राजा,
- 19 मादोनाचा राजा, हासोराचा राजा,
- 20 शिम्रोन-मरोनचा राजा, अक्षाफाचा राजा,
- 21 तानखाचा राजा, मगिद्दोचा राजा,
- 22 केदेशचा राजा, कर्मेलांतील यकनामाचा राजा,
- 23 नाफत-दोर येथील दोराचा राजा, गिलगाल येथील गोयीमचा राजा,
- 24 तिरसाचा राजा; या प्रमाणे एकंदर एकतीस राजे होते.