여호수아 15장 마라티 IRV
- 1 यहूदी वंशाला त्याच्या कुळाप्रमाणे नेमून दिलेला जो भाग चिठ्ठ्या टाकून मिळाला तो अदोमाच्या सीमेपर्यंत आणि दक्षिणकडे सीन रानापर्यंत अगदी दक्षिणेच्या सीमेपर्यंत पसरला आहे.
- 2 आणि त्यांची दक्षिण सीमा क्षारसमुद्राच्या शेवटची खाडी, जिचे तोंड दक्षिणेस आहे, तेथून झाली.
- 3 ती तशीच अक्रब्बीम नावाच्या चढणीच्या दक्षिणेकडे जाऊन सीन रानाच्या कडेने कादेश-बर्ण्याच्या दक्षिणेस गेली असून हेस्रोन नगराजवळून अद्दारा नगरावरून जाऊन कर्का नगराकडे वळली आहे.
- 4 आणि ती असमोना जवळून मिसरी नदीस गेली; नंतर तिचा शेवट पश्चिम समुद्रा नजीक आहे; अशी तुमची दक्षिण सीमा व्हावी.
- 5 आणि पूर्व सीमा क्षार समुद्रावरून यार्देनेच्या मुखापर्यंत आहे; आणि उत्तरेस कोपऱ्याची सीमा समुद्राच्या काठी यार्देनेचा मुखाजवळील समुद्राची खाडी तेथून आहे.
- 6 मग ती सीमा बेथ-होग्ला नगराच्या चढावावरून जाऊन बेथ-अराबा नगराच्या उत्तरेस जाते; नंतर ती सीमा रऊबेनाचा पुत्र बोहन याची धोंड तेथवर चढून गेली;
- 7 मग ती सीमा अखोरच्या खोऱ्यापासून दबीरापर्यंत जाऊन उत्तरेस गिलगालकडे वळली आहे; हे गिलगाल नदीच्या दक्षिणेस अदुम्मीमाच्या चढणीसमोर आहे, ती नदी दक्षिणेस आहे; नंतर ती सीमा एन-शेमेशाच्या नावाच्या झऱ्याजवळून जाऊन तिचा शेवट एन-रोगेलास होतो.
- 8 मग ती सीमा हिन्नोमाच्या पुत्राच्या खिंडीजवळून यबूसी म्हणजे यरूशलेम त्याच्या दक्षिण भागास चढून जाते; नंतर पश्चिमेस हिन्नोम खिंडीच्या समोर जो डोंगर, जो रेफाईमांच्या उत्तरेस आहे, खोऱ्याच्या शेवटी शिखरावर सीमा चढून गेली.
- 9 मग डोंगराच्या शिखरापासून नेफ्तोहाच्या पाण्याच्या झऱ्यापर्यंत सीमा पुढे गेली; आणि एफ्रोन डोंगरावरच्या नगरात जाऊन, बाला म्हणजेच किर्याथ-यारीम तिकडे ती सीमा पुढे गेली,
- 10 मग बालापासून ती सीमा पश्चिमेस सेईर डोंगराकडे फिरून यारीम डोंगर, म्हणजेच कसालोन त्याच्या उत्तरेकडल्या भागा जवळून गेली, आणि बेथ-शेमेशाकडे उतरून तिम्ना शहराकडे गेली.
- 11 मग ती सीमा एक्रोन शहराच्या बाजूस उत्तरेकडे गेली, आणि शिक्रोन नगरापर्यंत सीमा गेली आहे; मग बाला डोंगराजवळून जाऊन यबनेल नगरास गेली; या सीमेचा शेवट समुद्रात होता.
- 12 आणि पश्चिमेची सरहद्द महासमुद्रचा किनारा हीच सीमा होती, ही चहुकडली सीमा यहूदाच्या वंशास त्यांच्या कुळाप्रमाणे जो विभाग मिळाला त्याची होती.
- 13 आणि परमेश्वराने यहोशवास सांगितल्यानुसार यहोशवाने यफुन्नेचा पुत्र कालेब याला यहूदाच्या वंशाबरोबर वाटा दिला, त्याने किर्याथ-आर्बा, म्हणजेच हेब्रोन शहर हे त्यास दिले; हा आर्बा अनाक्यांचा पूर्वज होता.
- 14 मग तेथून कालेबाने अनाकाची तीन मुले शेशय व अहीमान व तलमय म्हणजे अनाकाचे वंशज यांना वतनातून घालवले.
- 15 नंतर तो तेथून दबीर शहरात राहणाऱ्यांवर चालून गेला; दबीराचे पूर्वीचे नाव किर्याथ-सेफर होते.
- 16 तेव्हा कालेब म्हणाला, “जो किर्याथ-सेफर लढून काबीज करून घेईल, त्यास मी आपली कन्या अखसा पत्नी करून देईन.
- 17 तेव्हा कालेबाचा भाऊ कनाज याचा पुत्र अथनिएल याने ते काबीज केले; यास्तव त्याने आपली कन्या अखसा त्यास पत्नी करून दिली.”
- 18 आणि ती त्याच्याकडे आली तेव्हा असे झाले की तिने आपल्या बापाजवळ शेत मागायला त्यास गळ घातली, आणि ती गाढवावरून उतरली, तेव्हा कालेबाने तिला म्हटले, तुला काय पाहिजे?
- 19 अखसाने उत्तर दिले, “मला आशीर्वाद द्या; कारण तुम्ही मला नेगेब दिले आहे तर मला पाण्याचे झरेही द्या.” त्याने तिला वरचे झरे व खालचे झरे दिले.
- 20 यहूदाच्या वंशाचे वतन त्यांच्या कुळाप्रमाणे हेच आहे;
- 21 यहूदाच्या वंशजांना दक्षिणेस अदोमाच्या सीमेजवळील नगरे मिळाली ती ही; कबसेल व एदेर व यागूर;
- 22 कीना व दीमोना व अदादा;
- 23 आणि केदेश व हासोर व इथनान;
- 24 जीफ, टेलेम व बालोथ;
- 25 हासोर-हदत्ता व करीयोथ हस्रोन (यालाच हासोरसुद्धा म्हणत)
- 26 अमाम व शमा व मोलादा;
- 27 आणि हसर-गदा व हेष्मोन व बेथ-पेलेट;
- 28 आणि हसर-शुवाल व बैर-शेबा व बिजोथा;
- 29 बाला, ईयीम व असेम;
- 30 आणि एल्तोलाद व कसील व हर्मा;
- 31 आणि सिकलाग व मद्मन्ना व सन्सन्ना;
- 32 आणि लबावोथ, शिलहीम, अईन व रिम्मोन; ही सर्व नगरे एकोणतीस त्यांची गावे.
- 33 तळवटीतली नगरे ही, एष्टावोल, सरा व अषणा;
- 34 जानोहा व एन-गन्नीम तप्पूहा व एनाम;
- 35 यर्मूथ व अदुल्लाम, सोखो व अजेका;
- 36 आणि शाराईम व अदीथईम व गदेरा व गदेरोथईम, अशी चौदा नगरे, आणि त्यांची गावे;
- 37 सनान व हदाशा व मिग्दल-गाद;
- 38 दिलन, मिस्पा व यकथेल;
- 39 लाखीश व बसकाथ व एग्लोन;
- 40 कब्बोन व लहमाम व किथलीश;
- 41 गदेरोथ बेथ-दागोन व नामा व मक्केदा; अशी सोळा नगरे, आणि त्यांची गावे.
- 42 लिब्ना व एथेर व आशान;
- 43 इफ्ताह व अष्णा व नजीब;
- 44 आणि कईला व अकजीब व मारेशा; अशी नऊ नगरे, आणि त्यांची गावे.
- 45 एक्रोन आणि त्याच्या उपनगरांसह त्याची गावे;
- 46 एक्रोनाजवळची आणि पश्चिमेची अश्दोदाची बाजूकडली सर्व वसाहत, त्याच्याजवळच्या खेडेगावांसह.
- 47 अश्दोद, त्याच्या सभोवतीची उपनगरे व खेडी; गज्जा, त्याच्या सभोवतीची उपनगरे आणि खेडी; मिसराचा ओहोळ व महासमुद्राच्या किनाऱ्यावरची नगरे.
- 48 आणि डोंगराळ प्रदेशातली नगरे ही, शामीर व यत्तीर व सोखो;
- 49 दन्ना व किर्याथ-सन्ना तेच दबीर;
- 50 अनाब व एष्टमो व अनीम,
- 51 आणि गोशेन व होलोन व गिलो. अशी अकरा नगरे, आणि त्याकडील खेडी,
- 52 अरब व दूमा व एशान,
- 53 यानीम व बेथ-तप्पूहा व अफेका,
- 54 हुमटा व किर्याथ-आर्बा तेच हेब्रोन व सियोर, अशी नऊ नगरे, आणि त्यांची खेडी.
- 55 मावोन, कर्मेल व जीफ व यूटा,
- 56 इज्रेल व यकदाम व जानोहा,
- 57 काइन, गिबा, व तिम्ना, ही दहा नगरे आणि त्यांची खेडी.
- 58 हल्हूल, बेथ-सूर व गदोर,
- 59 माराथ, बेथ-अनोथ व एल्तकोन; ही सहा नगरे आणि त्यांची खेडी.
- 60 किर्याथ-बाल म्हणजेच किर्याथ-यारीम व राब्बा ही दोन नगरे आणि त्यांची खेडी.
- 61 रानातली नगरे ही, बेथ-अराबा, मिद्दीन व सखाखा;
- 62 आणि निबशान व मिठाचे नगर व एन-गेदी; ही सहा नगरे आणि त्यांची खेडी.
- 63 तथापि यरूशलेमात राहणाऱ्या यबूसी लोकांस यहूदाच्या वंशजाना घालवता आले नाही; यास्तव यबूसी यरूशलेमात यहूदाच्या वंशजाजवळ आजपर्यंत राहत आहेत.